उत्तर महाराष्ट् बातमी

माजी सैनिकाला मारहाण; गृहमंत्री देशमुख यांच्याकडून भाजप खासदाराच्या चौकशीचे आदेश

जळगाव : माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. २०१६ साली भाजपचे तत्कालिन आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र, त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१६ साली सोनू महाजन या माजी सैनिक यांच्या कुटुंबियांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे उन्मेष पाटील यांचा होता. त्यांच्या घरात घुसून नऊ जणांनी त्यांना मारहाण केली होती. तीन वर्ष झाले त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदली नव्हती. उच्च न्यायालयात दाद मागितली तेव्हा २०१९मध्ये तक्रार नोंदण्यात आली. तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आली नाही, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे.

मी बीएसएफमध्ये पूर्व सैनिक असून २०१६ मध्ये तत्कालीन आमदार आणि सध्याचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्यासह नऊ जणांनी माझ्यावर हल्ला चढवला होता. अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असे माजी सैनिक सोनू महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भाजपचे सरकार असल्याने साधा एफआयआर देखील दाखल झाला नाही. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. याबाबत आलेल्या निवेदनांनुसार आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : अर्जेंटिनामध्ये असा एक नाईट क्लब आहे तिथं चक्क…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत