प्राण्यांना भूकंपाबद्दल माणसांआधीच माहिती मिळते? ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो?
बातमी महाराष्ट्र

प्राण्यांना भूकंपाबद्दल माणसांआधीच माहिती मिळते? ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो?

सध्या भारतात अनेक भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत. आजच महाराष्ट्रात नाशिक, पालघर आदी भागात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भूकंपाविषयी अनेक प्रश्न समोर येत आहेत. प्राण्यांना भूकंपाबद्दल माणसांआधीच माहिती मिळते? ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पशु वैद्यांच्या तज्ज्ञांच्या हवाल्याने डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. भूकंप जमिनीच्या पृष्ठभागावर जाणवण्यापूर्वी जमिनीतील कंपनीचा अंदाज प्राण्यांना येऊ शकतो. डॉ. रीटा गोयल यांच्या माहितीनुसार, प्राण्यांना याच गुणांमुळे भूकंपाची माहिती आपल्याआधी मिळते, याशिवाय प्राणी बहुतांशवेळाजमिनीवर झोपतात. त्यांचा जमिनीशी थेट संपर्क आहे. म्हणूनच प्राण्यांना माणसांपेक्षा काही क्षण आधीच जमिनीच्या पृष्ठभागाखालील हालचाल जाणवू शकते.

काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की प्राण्यांना त्यांच्या ‘फर’ (शरीरावरील केस) मधून मोठ्या खडकांच्या दाबामुळे तयार होणाऱ्या हवेचा दाब जाणवू शकतो. परिणामी भूकंपाच्या आधी क्रिस्टल्सच्या क्वार्टरमधून बाहेर पडलेल्या वायूंचा वास सुद्धा त्यांना आधी येऊ शकतो.

महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरी प्राण्यांना भूकंपाची चाहूल आपल्याआधी लागत असली तरी आपण त्यांचे संकेत कसे ओळखू शकतो? तर प्राणी मित्र व अभ्यासकांच्या माहितीनुसार जर घरातली मांजरे, कुत्री अचानक अस्वस्थ वाटू लागली, विनाकारण दुःखी किंवा घाबरलेली दिसू लागली तर हा भूकंपाचा संकेत असू शकतो. अर्थात यावरून कोणताही निकष काढता येणार नाही पण जर आपल्याला प्राण्यांच्या वागणुकीत अत्यंत सूचक व तीव्र बदल दिसून आले तर हे आपत्तीचे लक्षण असू शकते. प्राण्यांना आपल्याआधी आपत्तीची चाहूल लागते याबाबात उदाहरणे समोर असली किंवा संशोधन सुरु असले तरी अद्याप याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.