व्हिडिओ : कोरोनातही अंत्यविधीला हजारोंची गर्दी; महाराष्ट्र पोलीसही हतबल
पश्चिम महाराष्ट्र बातमी

व्हिडिओ : कोरोनातही अंत्यविधीला हजारोंची गर्दी; महाराष्ट्र पोलीसही हतबल

सोलापूर : राज्यात कोरोना संकट अद्यापही टळलेलं नसताना १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अशात अनेक जिल्ह्यांत परिस्थितीनुसार निर्बंध कडक केले जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. नुकतंच सोलापुरात महाराष्ट्राला कोरोना लढ्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं नुकतंच निधन झालं. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्यने लोकांनी गर्दी केली होती. राज्यात एकीकडे कोरोना संकट असल्याने लॉकडाउन लावण्यात आलेला असतानाही लोकांनी तुफान गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीसमोर पोलीसही हतबल झाल्याचं चित्र होतं. सुशील कुमार शिंदे यांचे समर्थक म्हणून देखील करण म्हेत्रे यांची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही करण म्हेत्रे यांचं पार्थिव मोदी स्मशानभूमीच्या दिशेने नेलं जात असताना मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याचं पहायला मिळाले.

https://twitter.com/echawadimedia/status/1393886809206124547

सोलापूरमधील सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत हा परिसर येतो. पण गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र पोलीस कमी पडल्याचं दिसत होतं. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने करोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं.