बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर, 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार…

औरंगाबाद : ”मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून दूर लोटणारा आहे. त्यामुळे मराठा समाजाचा या निर्णयाला विरोध असून शासनानं आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाने यापुढील लढाई रस्त्यावर उतरुन लढू, अशी भूमिका स्पष्ट केली.

“सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची किंबहुना आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार वारंवार अपयशी ठरत आहे, असं सांगताना मराठा समिती्च्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी आणि त्यांच्या जागेवर मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा बाळासाहेब थोरात यांपैकी कुणाचीही नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी करावी”, अशी मागणी यावेळी केरे पाटील यांनी केली.

तसेच, “मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही. म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी असा लावला जातोय. असा आरोपही यावेळी केरे पाटील यांनी केला. तसेच, मंत्री शपथ घेताना संविधनाला साक्ष ठेवून कोणत्याही समाजाप्रति सूडाची भावनी ठेवणार नाही, असं सांगतात. मग आरक्षणाप्रसंगी एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकतात”, असं म्हणत केरे पाटील यांनी वडेट्टीवार, भुजबळ यांच्यावर टीका केली.

त्याचबरोबर, येत्या सुनावणीवेळी राज्य सरकारला जो काही जोर लावायचाय त्यांनी तो लावावा. जर स्थगिती उठली नाही तर आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत मराठा समाज “आंदोलन सुरुच ठेवणार असं सांगत राज्य सरकारला मात्र यानंतर त्याची किंमत चुकवावी लागेल”, असा गर्भित इशारा यावेळी केरे पाटील यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.