2 तासासाठी एवढा रेट! मुंबईतील अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती
बातमी मुंबई

2 तासासाठी एवढा रेट! मुंबईतील अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती

मुंबई : मुंबईच्या क्राइम ब्रान्चने एक टॉप मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला जुहूमधील फाइव्ह स्टार हॉटेलमधून पकडल्याचं माहिती समोर आली आहे. मात्र तपासानंतर या दोघांना अटक केलं नाही, तर रेस्क्यू केल्याचं सांगितलं. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालाही अटक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा खान हिने चौकशीदरम्यान सांगितलं की, हे सेक्स रॅकेट ती गेल्या अनेक वर्षांपासून चालवत होती. पोलिसांना इशा खानबद्दल टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी टीमला जुहू येथील एका हॉटेलमध्ये धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती. इशा खानची माहिती मिळताच तातडीने क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला. यामध्ये त्याने टॉप मॉडल्सची मागणी केली. यानंतर इशा खानने त्यांना अनेक फोटो व्हाॉट्सअॅप केले. क्राइम ब्रान्चने यापैकी दोन फोटो सिलेक्ट केले. यामधील एक अभिनेत्री अनेक जाहिरातीत झळकली आहे तर दुसरीने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.

इशा खानने एका तरुणीसाठी दोन तासाचे दोन लाख रुपये असल्याचं सांगितलं. या दोन लाख रुपयात खानला 50 हजार रुपये दिले जातात. तर तरुणींना दीड लाखांची रक्कम दिल्याचं सांगितलं जात आहे. खोटे ग्राहक बनून पोलीस अधिकाऱ्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये एक रुम बुक केला आणि अभिनेत्री जशा हॉटेलमध्ये पोहोचल्या. क्राइम ब्रान्चच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं. अभिनेत्रीने चौकशीत सांगितलं की, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे त्या या व्यवसायत आल्या.