हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह; कॅम्पसमध्ये खळबळ
देश बातमी

हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह; कॅम्पसमध्ये खळबळ

अहमदाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादच्या (IIMA) शिकणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या हॉस्टेलच्या रुममध्ये आढळून आला आहे. बुधवारी तरुणीचा मृतदेह आढळला असून तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रिष्टी राज (Drishti Raj) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती हॉस्टेलच्या रुममध्ये एकटीच राहायची. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तिच्या मैत्रिणी रुमचा दरवाजा ठोठावत होत्या पण बराच वेळ आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने मैत्रिणींनी हॉस्टेल प्रशासनाला कळवलं, नंतर हॉस्टेलच्या गार्ड्सनी तिच्या रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत द्रिष्टीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याने तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली जात आहे. तिचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याचा तपास केला जात आहे. शिवाय तिचे WhatsApp चॅट देखील तपासले जाणार आहेत. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.