कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट
बातमी महाराष्ट्र

कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर राज्यात पावसानं उघड दिली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणात्य राज्यांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण उर्वरित दक्षिण भारतात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र अपेक्षित पाऊस झाला नाही. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. पण ढगाळ हवामानमुळे उष्णतेत वाढ झालेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर उद्या पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

यावर्षी जूनपासून राज्यात कोसळलेल्या हंगामी पावसाचा विचार केला असता, राज्यात समाधानकारक पाऊस कोसळला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण गेल्या आठवड्यात पावसानं पुन्हा जोर पडकल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.