लंडन हायकोर्टाचा मोठा निकाल; विजय माल्याला घोषित केले दिवाळखोर
बातमी विदेश

लंडन हायकोर्टाचा मोठा निकाल; विजय माल्याला घोषित केले दिवाळखोर

लंडन : भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या विजय माल्याबाबत लंडन हायकोर्टाने मोठा निकाल दिला असून त्याला दिवाळखोर ठरवले आहे. लंडन हायकोर्टाने आज(सोमवार) विजय माल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला आहे. याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कंसोर्टियमने माल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसूलीशी संबंधित खटला देखील जिंकला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आथा विजय माल्याची संपत्ती जप्त करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. तसचे, विजय माल्याकडून हायकोर्टाच्या आदेशाविरोधात अपील करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही समोर आले आहे. अनेक बँकांची फसवणूक करून विजय माल्या भारतातून फरार आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत.

बँकांच्या कंसोर्टियमने लंडन हायकोर्टाकडे मागणी केली होती की माल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करावं. भारतीय बँकांच्या या याचिकेवर झालेल्या व्हर्चुअल सुनावणीत लंडन हायकोर्टानेन बँकांच्या बाजूने निकाल देत, हायकोर्टाचे न्यायाधीश माइकल ब्रिग्स यांनी विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं जात असल्याचा निर्णय दिला.