गोल्डमॅन दत्ता फुगे खून प्रकरणाचा होतोय उलगडा; दोन मारेकऱ्यांना अटक
पुणे बातमी

गोल्डमॅन दत्ता फुगे खून प्रकरणाचा होतोय उलगडा; दोन मारेकऱ्यांना अटक

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील गोल्ड मॅन दत्ता फुगे खून प्रकरणाचा उलगडा होत असून त्यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर आता त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडूनही पोलिसांना काही शस्त्रसाठा मिळाला असून, पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. भोसरी परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न तो करत होता. त्यावेळी त्याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याल अटक केली होती. त्यानंतर कक्का धौलपुरीया याच्या आणखी दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रसन्ना पवार आणि अंकुश डांगले अशी या आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडूनही देशी पिस्टल आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

दिघी परिसरात 15 जुलै 2016 रोजी भारतमाता नगर इथं गोल्ड मॅन दत्ता फुगे यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यात कक्का धौरपुरीया याला प्रसन्ना पवार आणि अंकुश डांगले यांनीही मदत केली होती. त्यांनाही आता धौलपुरीया पाठोपाठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.