मोठी बातमी : या तारखेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला घेता येणार कोरोनाची लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : या तारखेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला घेता येणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशात केंद्र सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार आणि प्रादुर्भाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत.

दरम्यान, आज (ता. १९) पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत बैठकही झाली आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक Vला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.