भारतात सलग दुसऱ्या दिवशी जगातील सर्वाधिक रुग्णवाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

भारतात सलग दुसऱ्या दिवशी जगातील सर्वाधिक रुग्णवाढ

नवी दिल्ली : भारतात कोरोग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. सलग दुसऱ्या दिवशी जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ भारतात झाली आहे. मागील २४ तासांत जगातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास ९० हजार नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. मागील २४ तासांत ९२ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. मागील २४ तासांत ५१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात ६ लाख ९२ हजार ३५० रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तुलनेत अमेरिकेत 66,154 नव्या कोरोनाग्रस्तांची तर ब्राझीलमध्ये 41,218 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. काल नोंद झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या यादीत अनुक्रमे भारत, अमेरिका आणि ब्राझील पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

देशात गुरूवारी ८१ हजार ४६६ रुग्ण आढळून आले होते. तर ४६९ जणांचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी ७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल म्हणजेच शनिवारी ५१४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.