कोरोना इम्पॅक्ट बातमी

मे महिन्यातच भारतात होते ६४ लाख कोरोनाग्रस्त रुग्ण

नवी दिल्ली : भारतात आता मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात सध्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ४५ लाखांच्या वर गेला आहे. मात्र, ICMRने एक सीरो सर्वे केला असून यामध्ये मे महिन्यातच भारतात ६४ लाख कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच 64 लाख (64 लाख 68 हजार 388) लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीरो सर्वेक्षणानुसार ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता, त्या जिल्ह्यातही कोरोनाग्रस्त रुग्ण होते, असे सांगण्यात आले आहे. कोरोना चाचण्याचे प्रमाण कमी असल्याने कोरोनाचे निदान झाले नसल्याचे या सर्वेक्षणानुसार सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी घेण्यात आलेल्या नमुन्यापैकी 48.5% नमुने हे 18 ते 45 वयोगटातील होते.

सर्वेक्षणानुसार पॉजिटिव्हिटी रेट
ग्रामीण- 69.4%

शहरी (स्लम) एरिआ – 15.9%
शहरी (नॉन-स्लम) एरिआ – 14.6%

वयोगटानुसार घेतलेले नमुने
वयोगट नमुने (%मध्ये)
18 ते 45 – 43.3%
46 ते 60 – 39.5%
60च्या वर – 17.2%

हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जूनच्या दरम्यान करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी १८ वयावरील लोकांचा समावेश करण्यात आला होता. एकूण २८०० नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. देशातील २१ राज्यांच्या एकूण ७० जिल्ह्यांतून हे नमुने गोळा करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत