देशातील नव्या रुग्णांची नोंद स्थिरावली; मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नव्या रुग्णांची नोंद स्थिरावली; मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : देशातील नव्या रुग्णांची नोंद गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली दिसत असली तरी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून जवळपास ३ लाख रुग्णांची दररोज नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. देशात मागील २४ तासांत ०२ लाख ७६ हजार ११० जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या ०२ कोटी ५७ लाख ७२ हजार ४४० वर पोहोचली आहे. मृतांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी चार हजारांहून कमी झाली असली तरी ती चिंताजनक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात गेल्या २४ तासांत ३८७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे मृतांची एकूण संख्या ०२ लाख ८७ हजार १२२ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ही संख्या ३१ लाख २९ हजार ८७८ इतकी आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८६.७४ टक्क्यांवर गेले आहे. कोरोनातून आतापर्यंत ०२ कोटी २३ लाख ५५ हजार ४४० जण बरे झाले आहेत. मृत्युदर १.११ टक्के इतका आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेवर सक्षम पर्याय असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही जवळपास दोन कोटी लशीच्या मात्रा उपलब्ध आहेत, आणखी २६ लाख मात्रा तयार असून त्या येत्या तीन दिवसांत उपलब्ध करून दिल्या जातील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले.