देशात नव्या बाधितांच्या संख्येत घट मात्र, मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात नव्या बाधितांच्या संख्येत घट मात्र, मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना नव्या बाधितांच्या संख्येत घट होत असताना मृत्यूचे तांडव सुरुच आहे. देशात गेल्या २४ तासात ०१ लाख २० हजार ५२९ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर देशात काल दिवसभरात एक लाख ९७ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.३८ टक्के झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात काल दिवसभरात ३ हजार ३८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख ४४ हजार ८२ वर पोहोचला आहे. देशातला सध्याचा कोरोना मृत्यूदर १.२० टक्के आहे. कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे नमूद करीत ३७७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली आहे.

७ मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने शिखर गाठले होते, परंतु आता त्यांत ६८ टक्क्यांनी घट झाल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांबाबत तातडीने निर्णय होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.