कोरोनाची ओसरतेय लाट; दीड महिन्यांतील निचांकी रुग्णसंख्येची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची ओसरतेय लाट; दीड महिन्यांतील निचांकी रुग्णसंख्येची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव कमी होतना दिसत आहे. दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. कोरोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. देशात गेल्या २४ तासात १ लाख २७ हजार ५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २ हजार ७९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २ लाख ५५ हजार २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांतील कोरोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. आतापर्यंत देशात २ कोटी ८१ लाख ७५ हजार ०४४ कोरोना रुग्ण आढळले. तर यापैकी २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ३१ जार ८९५ रुग्णांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या देशात १८ लाख ९५ हजार ५२० कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद पडले आहे. देशात कासव गतीने लसीकरण होत आहे. आतापर्यंत २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.