सलग दुसऱ्या दिवशी तीन लाख पार; मृत्यूचाही उच्चांक
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सलग दुसऱ्या दिवशी तीन लाख पार; मृत्यूचाही उच्चांक

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्यूचा आकडाही चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ३२ हजार ७३० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशात दैनंदिन रुग्णवाढीचा नवा जागतिक उच्चांक नोंदवण्यात आला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये देशात देशात २ हजार २६३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८६ हजार ९२० रुग्णाना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून रुग्णसंख्या वाढीत भारताचा वेग सर्वाधिक आहे. ही बाब चिंताजनक असून यामुळे वैद्यकीय सेवांवर आणि आरोग्य सुविधांवरील ताण वाढत चालला आहे. दरम्यान देशात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला २४ लाख २८ हजार ६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बुधवारी देशात ३ लाख १४ हजार ८३५ रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली होती. रुग्णसंख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ होती. मात्र शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ही ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून असून नव्या उच्चांकाची नोंद झाली. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून बुधवारी २६ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३०६ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.