दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरला; मात्र, धोका कायम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरला; मात्र, धोका कायम

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी मोठा दिलासा देणारी आहे. देशात तब्बल दोन महिन्यांनंतर दिवसभरात (५ जून) सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मृत्यूंची संख्याही कमी होताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत एक लाख १४ हजार ४६० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एक लाख ८९ हजार २३२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. याच कालावधीत देशात दोन हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ रुग्ण उपचाराधीन असून, कोरोना बळींची एकूण संख्या तीन लाख ४६ हजार ७५९ वर पोहोचली आहे.

कोरोनातून आतापर्यंत २ कोटी ६९ लाख ८४ हजार ७८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात आतापर्यंत एकूण ३ लाख ४६ हजार ७५९ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण २३ कोटी १३ लाख २२ हजार ४१७ लोकांचे देशात लसीकरण झाले आहे.