देशातील नव्या रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नव्या रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यूचे तांडव सुरुच आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसभरात ३२०७ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिवसभरात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. याआधी सोमवारी १ लाख २७ हजार ५१० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर २७९५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग विसाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १७ लाख ९३ हजार ६४५ सक्रिय रुग्ण आहेत. तर २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांनी कोरोनावरील लस घेतली आहे.