कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २३ हजार ५२९ नव्या रुग्णांची भर; ३११ मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २३ हजार ५२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ हजार ०२० झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८ वर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आत्तापर्यंत देशातल्या तीन कोटी ३७ लाख ३९ हजार ९८० नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल दिवसभरात देशात ३११ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ४८ हजार ०६२ वर पोहोचला आहे.

लसीकरण
गेल्या २४ तासांत ६५ हजार ३४ लाख ३०६ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ८८ कोटी ३४ लाख ७० हजार ५७८ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *