देशात २४ तासात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; तर ४०३ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २४ तासात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; तर ४०३ मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र टळलेला नाही. कोरोनातून रोज बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आढळून येत असल्याने, काहीसा दिलासा मिळत आहे. मागील २४ तासांत देशात ३० हजार ९४८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील एकूण बाधितांची एकूण संख्या ३ कोटी २४ लाख २४ हजार २३४ झाली आहे. आजपर्यंत देशात ३ कोटी १६ लाख ३६ हजार ४६९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३ लाख ५३ हजार ३९८ असून, आजपर्यंत देशात ४ लाख ३४ हजार ३६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशात आजपर्यंत ५८ कोटी १४ लाख ८९ हजार ३७७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ५२ लाख २३ हजार ६१२ जणांचे मागील २४ तासांत लसीकरण झाले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट पर्यंत देशात ५० कोटी ६२ लाख ५६ हजार २३९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी १५ लाख ८५ हजार ६८१ नमुन्यांची काल तपासणी केली गेली, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.