सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त; तर १० दिवसांत ३६ हजार मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त; तर १० दिवसांत ३६ हजार मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अक्षरशः कहर सुरु आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. गेल्या १० दिवसांत देशात ३६हजार ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. तर काल एका दिवसांत ३९१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दिलासायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं असून त्यांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.