नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होतेय; मात्र, देशातील मृत्यूंच्या आकड्यांनी चिंता वाढवली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होतेय; मात्र, देशातील मृत्यूंच्या आकड्यांनी चिंता वाढवली

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. मात्र, मृत्यूच्या आकड्यांनी चिंता वाढवली आहे. दरम्यान, एक दिलासादायक बाब समोर आली असून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. मृत्यूंची संख्या कमी होतांना दिसत नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात कोरोनाचे ६० हजार ४७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही ७५ दिवसानंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर २ हजार ७२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ लाख १७ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात २ कोटी ९५ लाख ७० हजार ८८१ कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी, ३ लाख ७७ हजार ०३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २ कोटी ८२ लाख ८० हजार ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात आता ९ लाख १३ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात सध्या रिकवरी दर ९५.६४ टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
गेल्या २४ तासांत भारतामध्ये २,७२६ मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत २५ कोटी ९० लाख ४४ हजार ०७२ नागरिकांना लस देण्यात आली आहे.