कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात पुन्हा ६२२०८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद; मृत्यूंच्या आकड्यात काहीशी घट

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनामुळे मृतांची संख्या अद्याप चिंतेचे कारण आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बुधवारच्या तुलनेत देशात नवीन कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासात ६२ हजार २०८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १ लाख ०३ हजार ५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु आणखीही मृत्यूंचा आकडा हा २ हजारांच्या वर असून मागील २४ तासांत २ हजार ३३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात २ कोटी ९७ लाख ३१३ रुग्ण आढळले आहेत. तर २ कोटी ८४ हजार ९१ लाख ६७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ८१ हजार ९०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८ लाख २६ हजार ७४० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत देशात २६ कोटी ५५ लाख १९ हजार २५१ जणांना लस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *