देशात ६२२२४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; तर एवढ्या जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ६२२२४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; तर एवढ्या जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यू संख्या कमी झालेली नाही. देशात गेल्या २४ तासात ६२,२२४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०७,६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गेल्या २४ तासात २५४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत देशात २ कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर २ कोटी ८३ लाख ८८ हजार १०० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ७९ हजार ५७३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८ लाख ६५ हजार ४३२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात नविन करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. १५ जूनपर्यंत देशभरात २८,००, ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६,१९,७२,०१४ नागरीकांचे लसीकरण झाले आहे.