देशात सलग चौथ्या दिवशी जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात सलग चौथ्या दिवशी जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून दररोज येत असलेल्या आकडेवारीवरून सप्ट होत आहे. सलग चौथ्या दिवशी जगातील सर्वाधिक रुग्ण भारतात आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या २४ तासांत ९६ हजार ९८२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविवारी, कोरोना संक्रमणकाळातील आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. या दिवशी २४ तासांत १ लाख ०३ हजार ५५८ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात आतापर्यंत ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील ४३ लाख ९६६ नागरिकांचं लसीकरण काल पार पडलं. दरम्यान, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल रोजी यांसदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. ही बैठक सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

– एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी २६ लाख ८६ हजार ०४९
– एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी १७ लाख ३२ हजार २७९
– उपचार सुरू : ७ लाख ८८ हजार २२३
– एकूण मृत्यू : १ लाख ६५ हजार ५४७
– लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या : ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६