देशात कोरोनाचे थैमान; २४ तासांत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचे थैमान; २४ तासांत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे अक्षरशः थैमान घातले असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासांत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. मागील २४ तासांत रुग्णांची झालेली नोंद ही आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात गेल्या २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. मागील २४ तासांत ९० हजार ५८४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.