दिलासादायक! अडीच महिन्यांतील सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! अडीच महिन्यांतील सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एक दिलासादायक बातमी समोर आली असून अडीच महिन्यांतील सर्वात कमी नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्या अद्याप कमी झालेली नाही. अशातही काल दिवसभरात ७२ दिवसांमधल्या सर्वात कमी करोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७० हजार ४२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून,१ लाख १९ हजार ५०१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३ हजार ९२१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात सलग सातव्या दिवशी १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाखांपेक्षा कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ७० हजार ४२१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आणि ३९२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, आठवड्याच्या शेवटी ५३ हजार ००१ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी ३० मार्च रोजी ५३ हजार ४८० रुग्णांची नोंद झाली होती.

सलग ३२ व्या दिवशी देशात नविन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर, १३ जूनपर्यंत देशभरात २५ कोटी ४८ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. रविवारी १४ लाख ९९ हजार लसीं देण्यात आल्या. त्याचबरोबर आतापर्यंत सुमारे ३८ कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.