कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे बंद केलेल्या भारत-यूके विमानसेवेबद्दल केंद्राचा मोठा निर्णय
देश बातमी

कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे बंद केलेल्या भारत-यूके विमानसेवेबद्दल केंद्राचा मोठा निर्णय

मुंबई : भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे ही सेवा 8 जानेवारीपर्यंत रोखली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादीत स्वरूपात सेवा देण्यात येईल. 23 जानेवारीपर्यंत केवळ दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणांवरून उड्डाणे होतील असे सांगण्यात आले आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी याबाबत जाहीर केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुरी म्हणाले, भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यान प्रवासी उड्डाणे 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होतील. या उड्डाणे फक्त नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून चालवल्या जातील, असेही मंत्री म्हणाले. भारत आणि ब्रिटन दरम्यान विमान सेवा 8 जानेवारी 2021पासून पुन्हा उड्डाण सुरू होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड प्रकरणात आणखी एक संसर्गजन्य कोरोनाचा विषाणूचा कारणीभूत ठरल्यामुळे नवी दिल्लीने यूकेकडे जाणारी उड्डाणे बंद केली होती.

दरम्यान, ब्रिटनहून मुंबईत आलेल्या पॉझिटिव्ह प्रवाशांची संख्या 27 वर पोहोचली आहे. यापैकी 10 प्रवासी निगेटिव्ह रिपोर्ट्स आले आहेत. प्रवासी निगेटिव्ह आले तरी त्यांचे अहवाल पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आला नसल्याने या 27 प्रवाशांना सेव्हन हिल रुग्णालयातच विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे.