जगातील कोरोनामातेचे एकमेव मंदीर भारतात; हा आहे मातेचा आवडता रंग
देश बातमी

जगातील कोरोनामातेचे एकमेव मंदीर भारतात; हा आहे मातेचा आवडता रंग

नवी दिल्ली : कधीकधी अंधश्रद्धेचाही कडेलोट होतो आणि उत्तर प्रदेशमधल्या या मंदिरासारखी परिस्थिती जन्म घेते. उत्तर प्रदेशमधील एका गावात ग्रामस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत वर्गणी काढून कोरोना मातेचे मंदिराची स्थापना केली आहे. या मूर्तीची रोज पूजा-अर्चा केली जाते. कोरोना मातेला नैवेद्य, फुलांचा साज चढवला जातो आणि मागणं घातलं जातं तिच्याच नावाने असलेल्या कोरोनाला पिटाळून लावण्याचं!

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सगळ्यामध्ये कुठेही अविश्वास किंवा चुकीचं काही केल्याचा लवलेशही ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर नसतो. कोरोना माताच या महाभयंकर संकटातून मानवजातीचं संरक्षण करू शकेल असे या ठिकाणच्या लोकांना वाटत राहते. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधल्या शुक्लपूर गावात हा प्रकार घडला आहे. गावातल्या एका मोठ्याशा कडुलिंबाच्या झाडाखाली कोरोना मातेचं मंदिर आहे. या मंदिरात कोरोना माता म्हणून एका मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीला मास्क देखील घातलेला आहे. या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर कोरोनाबाबतचे सर्वात महत्त्वाचे उपाय दिलेले आहेत. यामध्ये मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं लिहिण्यात आलं आहे.

लोकांना कोरोनाच्या या संकटातून वाचवण्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी गावातल्या कडुलिंबाच्या झाडाखाली हे करोना मातेचं मंदिर उभारलं आहे. यासाठी गावकऱ्यांनीच वर्गणी काढून हा पुढाकार घेतला. पण प्रार्थना करायची म्हणजे गर्दी करायची, हे मात्र या मंदिरात दिसत नाही. कोरोना मातेचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ देखील शिस्तीत कोरोनाचे सर्व नियम पाळूनच उभे राहतात.

कोरोनामातेचा आवडता रंग पिवळा
कोरोना मातेला फक्त पिवळी फुलं, पिवळी फळं, पिवळ्या रंगाचा गोड नैवेद्य किंवा इतर कोणत्याही गोष्टी पिवळ्या रंगाच्याच चालतात. त्यामुळे कोरोनामातेचा आवडता रंगा हा पिवळा असल्याचे मानले जाते.