देशात नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ मात्र मृत्यूच्या आकड्यांत दिलासादायक घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ मात्र मृत्यूच्या आकड्यांत दिलासादायक घट

नवी दिल्ली : देशात मागील २४ तासांच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांच्या नव्या रुग्णांच्या आकड्यात काहीशी वाढ झाली असली तरी मृत्यूच्या आकड्यात मात्र दिलासादायक घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ८७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांत म्हणजे बुधवारी दिवसभरात दोन लाख ७६ हजार ७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ६९ हजार ७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ८७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या दोन लाख ८७ हजार १२२ वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ५९४ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ३४ हजार ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसताना दिसत आहे. गेल्या २४ तासात २ लाख ७६ हजार ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला ही संख्या तीन लाखांच्या आसपास होती. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. तर मंगळवारी देशात कोरोनाबळींचा नवा उच्चांक गाठला होता. मंगळवारी देशभरात चार हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या देशात ३१ लाख २९ हजार ८७८ रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही २ लाख ८७ हजार १२२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २ कोटी ५७ लाख ७२ हजार ४०० जणांना देशात कोरोनाची लागण झाली आहे तर २ कोटी २३ लाख ५५ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.