दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! लसीकरणाचा आकडा ३५कोटींच्या पार

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून देशातील लसीकरणाचा आकडा ३५ कोटींच्या पार गेला आहे. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. भारतात आतापर्यंत ३५ कोटी अधिक करोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत भारतात एकूण ३५ कोटी ७१ लाख ०५ हजार ४६१ लशीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यात पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३१.४४ लाखांपेक्षा जास्त लशीचे डोस दिले गेले आहेत. काल (रविवार) दिवसभरात एकूण १४ लाख ८१ हजार ५८३ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०लाख ३५ हजार ८०४ असून दुसरा डोस घेणारे ४ लाख ४५ हजार ७७९ नागरिक आहेत.

देशातील मृतांची संख्या घटली
तसेच काल दिवसभरात देशात ३९,७९६ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ७१ वर पोहोचली आहे. तर देशात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ९७ लाख ४३० झाली असून काल दिवसभरात ४२ हजार ३५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशातल्या मृतांची संख्या आज ८०० च्या खाली आल्याचं चित्र आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांत ७२३ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ४ लाख २ हजार ७२८ वर पोहोचली आहे.