देशात कोरोनाचा धोका कायम; आणखी एक लाख ३२ हजार नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा धोका कायम; आणखी एक लाख ३२ हजार नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचा धोका कायम; आणखी एक लाख ३२ हजार नव्या रुग्णांची नोंद

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजलेला असताना काही प्रमाणात कोरोनाच्या आकड्यांत घट झाली असली तरी धोका कायम आहे. देशातील करोना संक्रमणाचा दर घटताना दिसून येत आहे. सलग ११ व्या दिवशी देशातील संक्रमणाचा दर १० टक्क्यांच्या खाली नोंदविण्यात आला आहे. देशाचा संक्रमणाचा दर ६.३७ टक्क्यांवर आला आहे.

मागील २४ तासांत १ लाख ३२ हजार ३६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २७१३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ०७ हजार ०७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासोबत, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या १६ लाख ३५ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ४० हजार ७०२ वर पोहचलीय.

एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५
उपचार सुरू : १६ लाख ३५ हजार ९९३
एकूण मृत्यू : ३ लाख ४० हजार ७०२
कोरोना लसीचे डोस दिले गेले : २२ कोटी ४१ लाख ०९ हजार ४४८