धोका कायम मात्र देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोका कायम मात्र देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. मृत्यूचे तर अक्षरशः तांडव पाहायला मिळाले होते. अजूनही संकट टळले नसले तरी दिलासादायक बाब म्हणजे दुसऱ्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात एकूण १ लाख ५२ हजार ७३४ लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले. जे गेल्या ४७ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या चिंतेचा विषय आहे. बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी मृत्यूंच्या आकडेवारीत घट होतांना दिसत नाही. गेल्या २४ तासात ३ हजार १२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर गेल्या गेल्या २४ तासात २ कोटी ३८ हजार ०२२ रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या कोरोनाची एकूण २० लाख २६ हजार ०९२ अॅक्टिव्ह रुग्णा आहेत. आतार्यंत देशात २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४ रुग्ण आढळले. तसेच २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतार्यंत ३ लाख २९ हजार १०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरणाची मोहिम जोरात हाती घेण्यात आली असून लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद पडले आहे. देशात कासव गतीने लसीकरण होत आहे. आतापर्यंत २१ कोटी ३१ लाख ५४ हजार १२९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.