देशात नव्या रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या खाली मात्र, मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात नव्या रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या खाली मात्र, मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी मात्र मृत्यूचे तांडव सुरुच आहे. काल दिवसभरात देशात आढळलेल्या नव्या बाधितांची संख्या दोन लाखांच्या आत आहे. देशात काल दिवसभरात तीन हजार ६६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता तीन लाख १८ हजार ८९५वर पोहोचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात काल दिवसभरात एक लाख ८६ हजार ३६४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधितांची संख्या यापेक्षा निश्चितच अधिक होते. गेल्या आठवड्यात तर ही संख्या तीन लाखांच्याही वर होती. देशात सध्या २३ लाख ४३ हजार १५२ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर आत्तापर्यंतच्या एकूण करोना रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ७५ लाख ५५हजार ४५७ वर पोहोचला आहे.

तर काल दिवसभरातल्या नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. काल देशातले दोन लाख ५९ हजार ४५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९०.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० वर पोहोचली आहे.