भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन
बातमी विदेश

भाषणादरम्यान झालेल्या गोळीबारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. शिंजो आबे यांच्या कार्यकाळात त्यांचे भारताशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

NHKया जपानी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पत्रकाराने या ठिकाणी गोळी झाडल्यासारखा आवाज ऐकला आणि शिंजो आबे जखमी झाल्याचंही पाहिलं. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.