जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडणारा ‘तो’ तरुण कोण?
बातमी विदेश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडणारा ‘तो’ तरुण कोण?

टोकियोः माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांचं भाषण सुरु असताना अचानक गर्दीतून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आले. शिंजो आबे स्टेजवरच कोसळले. काही मिनिटांच्या या घटनेमुळं संपूर्ण जपानमध्ये खळबळ उडाली आहे. शिंजो आबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, भरवस्तीत शिंजो यांच्यावर गोळी चालवणारा कोण असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. शिंजो आबे यांच्यासोबत काय घडलं जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिंजो आबे या निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने ते तिथेच स्टेजवर कोसळले. बंदुकीच्या आवाजाने तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. शिंजो आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेण्याआधी त्यांनी सीपीआर देण्यात आल्याचंही कळतंय.

शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडणाऱ्या तरुणाचे नाव यामागामी तेत्सुया (Yamagami Tetsuya) असं असून तो ४१ वर्षांचा आहे. आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतरही हल्लेखोर तिथेच थांबून राहिला होता, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागामी तेत्सुया हा सेल्फ डिफेंन्स फोर्समधील सदस्य म्हणून कार्यरत असून तो शूटर आहे, अशीही माहिती समोर येत आहे. तसंच, पोलिसांनी घटनास्थळावरुन बंदूक जप्त केली आहे.

दरम्यान, शिंजो आबे यांच्या छातीवर गोळी झाडल्यामुळं ते स्टेजवरच कोसळले. तसंच, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सीपीआर देण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचं कळतंय.