अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची आयकर विभागाची माहिती
देश बातमी

अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची आयकर विभागाची माहिती

नवी दिल्ली : अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला असल्याचे आयकर विभागानं आज एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. आयकर विभागाने सलग तीन दिवस सोनू सूदच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. अनेक बोगस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा २० नोंदींचा वापर केल्याचं उघड झालं आहे. तसेच संबंधित सर्वांनीच बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचंही मान्य केलं आहे.

तसेच, कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला आहे, असे आयकर विभागाने सांगितले आहे.