नियम मोडणाऱ्या वाहनांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार
बातमी महाराष्ट्र

नियम मोडणाऱ्या वाहनांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो. वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि नियम मोडणाऱ्यांना थेट त्यांच्या घरीच दंडाचं चालान पाठवलं जातं. पण आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचं खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.याबाबत वाहतुक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी आदेश काढलेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी सारंगल म्हणाले कि, आता वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. आणि जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढलेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो.