मराठवाड्याच्या सुपुत्राला वीरमरण! छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद
बातमी मराठवाडा

मराठवाड्याच्या सुपुत्राला वीरमरण! छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात मराठवाड्यातील नांदेडचे सुपुत्र आणि आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले. आयटीबीपीने ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. या घटनेने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयटीपीबीचे एकूण दोन अधिकारी शहीद झाले आहेत. यात आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट आणि एएसआय गुरुमुख सिंह हे शहीद झाले. आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनमध्ये ते सेवेत होते. नक्षलवद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून ६०० मीटर अंतरावर हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांची शस्रही लुटून नेली. एक एके ४७ रायफल, दोन बुलेटप्रुफ जॅकेट आणि वॉकी टॉकी नक्षलवाद्यांनी लुटले.

अशोक चव्हाणांची श्रद्धांजली
नांदेडचे सुपुत्र व आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांना छत्तिसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण देश शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. शहीद सुधाकर शिंदे अमर रहे!.. असं ट्वीट करत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.