चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली
बातमी विदेश

चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली

नवी दिल्ली : चीन सरकारवर केलेली टीका चीनमधील सर्वात नामांकित कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना चांगलीच भोवली आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगातील आघाडीचे उद्योजक असलेल्या जॅक मा यांचं नाव चीनच्या सरकारी माध्यमाने देशातील अव्वल उद्योजक नेत्यांच्या यादीतून हटवलं आहे. तर, या यादीमध्ये Huawei Technologiesचे रेन झेंगफेई , शाओमीचे लेई जून आणि बीवायडीचे वांग चाउंफू यांनी दिलेल्या योगदानाचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मंगळवारी अर्थात अलिबाबा कंपनीने या तिमाहीतील ताज्या कमाईचा अहवाल सादर करण्यापूर्वीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये जॅक मा यांनी देशात संशोधनाला वाव मिळत नाही असं मत व्यक्त करण्याबरोबरच जागतिक बँकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर जॅक मा काहीदिवस गायबही होते.