माजी मुख्यमंत्र्यांचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली
देश बातमी

माजी मुख्यमंत्र्यांचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे मृत्यूचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. अशात राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे बुधवारी रात्री उशिरा कोरोनामुळे निधन झाले आहे. राज्य सरकारने एक दिवस राज्यात शोक जाहीर केला असून राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहाडिया यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहाडिया यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक करताना राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. आपल्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सबलीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना ! असे म्हटले आहे.

तर मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्वीट केले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. पहाडीया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये होते. गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, पहाडीया करोनामुळे आमच्यातच राहिले नाहीत. त्यांच्या मृत्यूने मला धक्का बसला. तसेच माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.