जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा; योशीहिदे सुगा यांची घेतली जागा
बातमी विदेश

जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा; योशीहिदे सुगा यांची घेतली जागा

टोकियो : जपानचे मुत्सद्दी राजकारणी फुमियो किशिदा जापानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक जिंकली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा निवडणूक जिंकताच देशाच्या पुढील पंतप्रधान होण्यास तयार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

किशिदा जपानचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे प्रमुख, पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा एका वर्षानंतर पद सोडणार आहे. एक वर्षापूर्वी, तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आले.

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला किशिदाच्या रूपाने नवीन नेता मिळाला आहे. आता हे ठरवण्यात आले आहे की, सोमवारी जेव्हा संसद पंतप्रधानांच्या नावावर निर्णय घेईल, तेव्हा किशिदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. किशिदांचा पक्ष संसदेत बहुमतात आहे आणि आघाडीचा पक्ष म्हणून सरकारचा भाग आहे. किशिदा यांनी देशाचे व्हॅक्सिनेशन मंत्री असलेल्या तारो कोनो यांचा पराभव केला आहे. कानो व्यतिरिक्त, या शर्यतीत साने ताकीची आणि सेको नोडा या दोन महिला उमेदवारही होत्या. पण दोघेही पहिल्या फेरीनंतर बाहेर पडल्या. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता ते पुढील महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.

किशीदा यांची पार्श्वभूमी
29 जुलै 1957 रोजी हिरोशिमा इथल्या मिनामी कु या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात
2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री
एलडीपीच्या धोरण संशोधन परिषदेचे अध्यक्षही राहिले
वडील आणि आजोबा दोघेही जपान लोअर हाऊसचे सदस्य
जपानचे माजी पंतप्रधान किशी मियाजावा हे त्यांचे नातेवाईक
1982 मध्ये त्यांनी वासेदा विद्यापीठातून कायद्याची पदवी
1993 मध्ये खासदारकीची निवडणूक जिंकली
किशिदा यांनी क्रेडिट बँक ऑफ जपानमध्ये बराच काळ काम
1993 मध्ये ते प्रतिनिधी सभागृहात निवडून आले
2007 ते 2008 पर्यंत ते ओकिनावा अफेअर्स मंत्री म्हणून काम
2008 मध्ये ग्राहक आणि अन्न सुरक्षा राज्यमंत्री म्हणून काम