देश बातमी

ट्रेनमध्ये अंडरवेअरवर फिरले आमदार; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : बिहारचे जनता दल (यू)चे एक आमदार रेल्वे प्रवासात चक्क अंडरवेअरमध्ये फिरताना दिसले. या प्रकरणाची माहिती त्यांच्या सहप्रवाशांनी दिली आहे. जेडीयूचे आमदार गोपाल मंडल तेजस राजधानी एक्सप्रेसच्या एसी फर्स्ट क्लासच्या डब्यात पाटण्याहून दिल्लीचा प्रवास करत होते. यावेळी ते फक्त अंडरविअर आणि बनियनवर होते. ही घटना गुरुवारी घडली. त्यानंतर या प्रकरणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमदार मंडल यांच्या या वर्तणुकीवर त्यांच्या सहप्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रकार भांडणापर्यंत जाऊन पोहोचला. रेल्वे पोलीस दल (आरपीएफ) आणि तिकीट परीक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.

दरम्यान, आमदार असलेल्या व्यक्तीने प्रवासात असं फिरल्यावरून टीकाही झाली. त्यानंतर आमदारांनी झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय. मंडल यांनी असं फिरण्याला त्यांच्या पोटाला दोष दिला. ते म्हणाले, की मी ट्रेनमध्ये चढताच माझं पोट बिघडलं, त्यामुळे मी अंडरविअर आणि बनियनवर फिरत होतो, मी खोटं बोलत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *