JEE Result : जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित; असा पहा निकाल
देश बातमी

JEE Result : जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित; असा पहा निकाल

नवी दिल्ली : जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर १८ उमेदवारांना टॉप रँक मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र २०-२५ जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र २६ ऑगस्टपासून २ डिसेंबरपर्यंत आयोजित होतं.

असा पहा निकाल
अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा
होम पेजवर JEE Main 2021 session 4 results लिंकवर क्लि करा
अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरून सबमिट करा
चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल

या वेबसाईट्सवर चेक करु शकता जेईई मेन निकाल २०२१
nta.ac.in
ntaresults.nic.in
jeemain.nta.nic.in