मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी
काम-धंदा बातमी

मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी

मुंबई : तरुणांसाठी एक मोठी बातमी असून रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500 उमेदवारांची भरती करणार आहे. रेल्वेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती उपलब्ध आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रेल्वेत अप्रेंटीस म्हणून ज्यांना भरती व्हायचं आहे त्यांनी ५ मार्चपर्यंत RRCCR.COM या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आज शनिवार (ता. ०६) पासून हे अर्ज खुले होत आहेत. मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये अप्रेंटीसची तब्बल २५३२ पदं उपलब्ध आहेत.

मालगाडी दुरूस्ती विभाग, कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता
https://rrccr.com