अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा
बातमी विदेश

अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा

नवी दिल्ली : अमेरिकेने काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली आहे. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले आहेत. या हल्लयामध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये १३ अमेरिकन सैनिक असल्याने अमेरिका या हल्ल्यानंतर चांगलाच खवळली होती. इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस के या संघटनेनं बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन लष्कराने हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले. सुरक्षेच्या कारणांमुळे अमेरिकन नागरिकांना विमानतळांच्या वेगवेगळा प्रवेशद्वारांपासून तात्काळ दूर होण्यास सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी यासंदर्भातील माहिती जारी केलीय. अमेरिकन लष्कराने एक आयएसआयएस के प्लॅनरविरोधात दहशतवादीविरोधी मोहीम राबवली आहे, असं अर्बन म्हणाले आहेत.