कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

अमरावती : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये उद्या (ता. २२) सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला. अमरावतीतील अनेक भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. येथे एक आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अमरावतीतील 60 टक्के भागात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं वृत्त समोर आले होतं. त्यानंतर कोरोनाची वाढलेली रुग्णसंख्या पाहता येथे पुढील 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

यादरम्यान नागरिकांच्या लॉकडाऊनच्या नियमांचा पालक करणे बंधनकारक असणार आहे. या विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं कोविड 19च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही मात्र कोरोनाची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेत असल्याचे पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.