राज्यातील आणखी एका शहरात सलग सात दिवस कडकडीत लॉकडाऊन जाहीर
बातमी विदर्भ

राज्यातील आणखी एका शहरात सलग सात दिवस कडकडीत लॉकडाऊन जाहीर

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूरातील लॉकडाऊनची घोषणा केली. ‘नागपूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.’

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून काय चालू राहणार आणि काय बंद राहील याची नियमावलीही जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. या काळात जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येणार असून गृहविलगीकरणाच्या रुग्णांनी काटेकोर नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

काय राहील सुरु
– उद्योग सुरू राहतील
– सरकारी कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरू
– वैद्यकीय सेवा सुरू राहतील
– मार्च एंडिंगशी निगडीत लेखा विषयक कामांना परवानगी
– माध्यम प्रतिनिधींनीही RTPCR चाचणी करून बाहेर निघावं
– खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरू राहणार

काय राहील बंद
– खासगी कार्यालये बंद
– अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद