उत्तर प्रदेशात विनामास्क आढळल्यास होणार १० हजार दंड
देश बातमी

उत्तर प्रदेशात विनामास्क आढळल्यास होणार १० हजार दंड

लखनौ : देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून दिल्ली, राजस्थानपाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनंही वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशा एकाच दिवसात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे विनामास्क आढळल्यास उत्तप्रदेशात १० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेशात गुरुवारी दिवसभरात २० हजार ५१० रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात रविवारी वीकेंड लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण उत्तर उत्तर प्रदेशात लॉकडाउन लागू केला जाणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांवरही सरकारने दंड वसूलीचा बडगा उगारला आहे.

उत्तर प्रदेशात आता विनामास्क फिरणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तीच व्यक्ती पुन्हा विनामास्क आढळून आल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि बेडची मागणी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारकडून नवीन कोविड रुग्णालये उभारण्यात येणार असून, स्थानिक रुग्णालयांचं रुपांतर कोविड केंद्रात करण्यास सुरू करण्यात आली आहे.