महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला भूकंपाचा हादरा; ३.७ रिश्टर स्केल तीव्रता

मुंबई : आज (ता. २४) महाराष्ट्रातील पालघर शहराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले. ३.७ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मे महिन्यात यापुर्वी पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली होती.

पालघर परिसरात झालेल्या भूकंपामूळे कोणतीही हानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.